समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या वैष्णवी सोनवणे चे कुस्ती स्पर्धेत यश!!५० किलो वजनी गटात प्रथम!!

समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या वैष्णवी सोनवणे चे कुस्ती स्पर्धेत यश!!
५० किलो वजनी गटात प्रथम!!
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे अंतर्गत रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल व जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकतीच शिरोली ता.जुन्नर येथे पार पडली.त्यामध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या विद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी सोनवणे हिने कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये १९ वर्षाखालील वयोगटातील ५० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
नियमित व्यायाम व कसरत त्याचबरोबर जिद्द,चिकाटी आणि क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणूनच या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळवल्याचे वैष्णवी सोनवणे हिने सांगितले.
कुस्ती संकुल वडकी,तालुका-हवेली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सदर विद्यार्थिनीची निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.
क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,बाबाजी भोर,किरण वाघ,प्रा.संतोष पोटे,प्रा.संगीता रिठे,प्रा.विनोद चौधरी यांनी वैष्णवीला मार्गदर्शन केले.
वैष्णवी ने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभाग प्रमुखशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.