अरविंदच्या अकाली जाण्याने जारकरवाडी(ता.आंबेगाव)गावावर पसरली शोककळा

अरविंदच्या अकाली जाण्याने जारकरवाडी(ता.आंबेगाव)गावावर पसरली शोककळा
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.गावातली होतकरू तरुण श्री.अरविंद बाबुराव ढोबळे(वय-३३ वर्ष) याचे डेंग्यू सदृश्य आजाराने अकाली निधन झाल्याने गावातली ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.
सतत हसमुख,मितभाषी,गावातली सामाजिक,धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रमात अरविंदचा नेहमीचं सहभाग असायचा. गावातली सार्वजनिक नवरात्र उत्सव,गणपती उत्सव,वार्षिक यात्रा महोत्सव आदी कार्यक्रमांत अरविंद सक्रिय असायचा. एक अजातशत्रू व्यक्ती म्हणून परीसरात अरविंदची परीसरात ओळख होती. भावड्या या टोपण नावाने तो सुपरिचित होता.
अरविंदला तीन- चार दिवसांपूर्वी ताप येऊन आजारी पडल्याने प्रथम निरगुडसर, पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार केले होते. त्याच्या रक्ताच्या तपासणी अहवालात डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्याचे समजले. तब्येतीत फरक न पडल्याने त्याने मंचर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्यानंतरही त्याची तब्येत आणखीनच खालावल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पुणे येथील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
ह.भ.प बाबुराव महाराज ढोबळे यांचा तो मुलगा असून मंगलम ॲग्रोटेक चे अविनाश बाबुराव ढोबळे यांचा तो धाकटा भाऊ होता.