वडगावपीर(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.योगेश शांताराम आदक तर उपअध्यक्षपदी छाया गुळवे यांची बिनविरोध निवड!!

वडगावपीर(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.योगेश शांताराम आदक तर उपअध्यक्षपदी छाया गुळवे यांची बिनविरोध निवड!!
आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.योगेश शांताराम आदक तर उपाध्यक्षपदी छाया गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या मा.अध्यक्षा सौ.सुवर्णा राजगुडे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य निवडीसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यात समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकेचे कामकाज केन्द्र प्रमुख श्री.भगवंत टाव्हरे सर यांनी पाहिले,तर सूत्रसंचालन गणेश गावडे सर,सुरेखा वाळूंज, वैशाली नाटे यांनी केले.
यावेळी मा.सरपंच संजय पोखरकर अण्णासाहेब आदक,रविंद्र गुळवे,एकनाथ आदक,उत्तम आदक, दता सांडभोर,दिगांबर आदक, दत्ता पोखरकर,मच्छिंद्र पोखरकर,संतोष आदक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष योगेश आदक यांनी भाषणात माजी अध्यक्ष यांनी केलेल्या कामाबाबत गुणगौरव व्यक्त केला. यापुढे गावातिल सर्वांच्या विश्वासाला पात्र राहुन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.