के.के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी कै.बाळासाहेब वाघ यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल येथे स्मृतींना अभिवादन!!

के.के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी कै.बाळासाहेब वाघ यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल येथे स्मृतींना अभिवादन!!
नाशिक ( प्रतिनिधी)निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील के.के. वाघ शिक्षण संस्था नाशिक संचलित, के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल व के.के. वाघ प्राथमिक विद्याभवन येथे के.के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी कै.बाळासाहेब वाघ यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी प्राचार्य बाळासाहेब मोंढे, प्राचार्य यशवंत ढगे, श्रीमती योगिता पवार, विद्या गंगावणे आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कर्मयोगी कै.बाळासाहेब (भाऊ)वाघ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबाबत, संस्थेच्या पायाभरणीबाबत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्राचार्य बाळासाहेब मोंढे यांनी भाऊंच्या तृतीय स्मृती दिनी त्यांच्या जल संधारण , सहकार, संघटनात्मक व शैक्षणिक कार्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी भाऊंच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवयानी साळवे,प्रास्ताविक दीपक वाघ,आभार प्रदर्शन ऋषिकेश पवार यांनी केले.
के.के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी कै.बाळासाहेब वाघ यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त स्मृतींना अभिवादन करतांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद