श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ चे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर लोणी(धामणी) येथे संपन्न!!

श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ चे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर
लोणी(धामणी) येथे संपन्न!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ चे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर
लोणी(धामणी) येथे संपन्न झाले.
या श्रम संस्कार शिबिरा अंतर्गत विद्यार्थी यांनी श्रमदानातून लोणी गावात परीसर स्वच्छता केली. तसेच
ग्रामस्थांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी मार्फत लावण्यात आलेल्या १००० झांडाना पाणी दिले. या प्रसंगी विविध
व्याख्यान मालेचे आयोजन केले गेले होते.
या कार्यक्रमाच्या समारोप समारंभास
शिक्षण प्रसारक मंडळ पाबळचे अध्यक्ष सोपानराव जाधव,उपाध्यक्ष कुमारशेठ बगाटे,सर्व संचालक मंडळ
तसेच महसूल मंत्रालय सहसचिव कैलासराव गायकवाड,लोणी गावचे सरपंच सावळाभाऊ नाईक,उपसरपंच स्वातीताई वाळुंज कार्यक्रम अध्यक्ष दिलिपशेठ वाळुंज,सर्व ग्रामपंचायत सदस्य महाविद्यालय चे प्राचार्य प्रा. डॉ .संजय घोडेकर सर पाबळ गावचे मा.सरपंच सचिनशेठ वाबळे,उपसरपंच किरणताई पिंगळे,
महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी,
शिबिर प्रमुख प्रा.डॉ. वर्षाराणी जाधव मॅडम,सहप्रमुख प्रा.अमित उकिर्डे सर,प्रा.राहुल सोनवणे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भुमकर मॅडम, ढोबळे सर, पोखरकर सर,
लोणी वि.का.सोसायटी व्हा.चेअरमन बबनदादा वाळुंज तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी लौकिक खंडागळे,हर्षल सुतार यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सर्वांचे आभार मानले.