आरोग्य व शिक्षणसामाजिक

डॉ.संकेत सुभाष काचोळे यांना किंग्स्टन युनिव्हर्सिटी, लंडनने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रातील संशोधनासाठी पी.एच.डी पदवी केली प्रदान!!

शैक्षणिक प्रवासात नवे मापदंड ठरवणारे डॉ. संकेत काचोळे!!

डॉ.संकेत सुभाष काचोळे यांना किंग्स्टन युनिव्हर्सिटी, लंडनने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रातील संशोधनासाठी पी.एच.डी पदवी केली प्रदान!!

शैक्षणिक प्रवासात नवे मापदंड ठरवणारे डॉ.संकेत सुभाष काचोळे!!

डॉ. संकेत सुभाष काचोळे यांना 21 जानेवारी 2025 रोजी किंग्स्टन युनिव्हर्सिटी, लंडनने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रातील संशोधनासाठी पीएचडी प्रदान केली आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत. न्यूरोमॉर्फिक व्हिजन, व्हिडिओ विश्लेषण, आणि आरोग्य सेवांमध्ये मल्टीमोडल AI तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रांवर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या कामाला 2024 मध्ये कॅनडामधील CVPR आणि इटलीतील मिलान येथे झालेल्या ECCV परिषदांमध्ये सर्वोत्तम संशोधन पेपरचा सन्मान मिळाला आहे.

सुपारीमुळे होणाऱ्या कॅन्सरच्या निदानात नवा शोध!!

डॉ. संकेत काचोळे यांचे संशोधन सुपारीमुळे होणाऱ्या ओरल कॅन्सरच्या लवकर निदानावर आधारित आहे. त्यांनी AI आधारित प्रतिमांच्या साहाय्याने तयार केलेली प्रीक्लिनिकल निदान पद्धती विकसित केली आहे, जी रक्त व लाळेच्या नमुन्यांच्या चाचण्यांसह कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर निदान करण्यात उपयुक्त ठरते. भविष्यात, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ फोनचा वापर करून कॅन्सर ओळखणे सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

डॉ. संकेत सुभाष काचोळे यांनी लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये पोस्टडॉक्टरल संशोधक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या संशोधनाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली असून, कर्करोग निदान क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे.

शिरदाळे (ता.आंबेगाव,जिल्हा पुणे) गावचे मा.सरपंच सुभाष काचोळे यांचा संकेत हा मुलगा आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना उच्च शिक्षन देऊन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.