निमणबेट शाळेत ‘शाळा प्रवेश उत्सव’ उत्साहात साजरा; नवागतांचे जल्लोषात स्वागत!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट येथे ‘शाळा प्रवेश उत्सव’ आणि ‘नवागतांचे स्वागत समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे (नवागतांचे) स्वागत ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या प्रभातफेरीने करण्यात आले, ज्यामुळे शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्वागत समारंभात नवागतांना गुलाबपुष्प देऊन, तसेच वही, पेन आणि पेन्सिल यांसारखे लेखन साहित्य देऊन शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करताना त्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गावचे उपसरपंच श्री. नितीनशेठ मारुती ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य वीरेंद्र ढोबळे,सदस्या लताताई ढोबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश ढोबळे,उपाध्यक्ष सौ सुरेखा ढोबळे तसेच सदस्य अशोक ढोबळे, राहुल ढोबळे, किशोर ढोबळे, तेजस थोरात, सचिन ढोबळे, संतोष ढोबळे, अस्मिता ढोबळे, कावेरी ढोबळे,सुनिता ढोबळे, वर्षा ढोबळे,स्वाती ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
येवळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामदास उंडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. चंद्रप्रभा अरगडे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा नवागतांसाठी अविस्मरणीय ठरला आणि शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली.
