जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी) च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.संतोष भागुजी गवारी व उपाध्यक्ष सौ.सुरेखा सोपान गवारी यांची बिनविरोध निवड!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी) च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.संतोष भागुजी गवारी व उपाध्यक्ष सौ.सुरेखा सोपान गवारी यांची बिनविरोध निवड!!
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. संतोष भागुजी गवारी व उपाध्यक्षपदी सौ.सुरेखा सोपान गवारी यांची बिनविरोध व बहुमताने निवड करण्यात आली.यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी स्वप्निल काशिनाथ गवारी, संदीप ज्ञानेश्वर गवारी,महेंद्र हरिभाऊ गवारी, रमेश गणपत गवारी, माधुरी आनंद गवारी ,संजना गणेश गवारी,मेघा धनेश गवारी,विशाल राजाराम गवारी,संदीप दत्तात्रय गवारी, वर्षा बाबाजी गवारी,विमल दादाभाऊ केदारी यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री.राहुल सुहास पाटील व सचिवपदी सीमा गुलाबराव काळे यांची निवड करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या मा. अध्यक्ष सौ.माधुरी गवारी, उपाध्यक्ष श्री.महेंद्र गवारी यांचा व नवनियुक्त पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पीरसाहेब दूध डेअरीचे चेअरमन अरुण गवारी,सचिव निलेश गवारी, सुरेश गवारी,संदीप गवारी,ग्रामपंचायत सदस्य विशाल गवारी व सर्व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा काळे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार उपशिक्षक श्री राहुल पाटील यांनी मानले.
पिरसाहेब दूध डेअरीचे चेअरमन श्री. अरुण गवारी यांनी शाळेसाठी स्वखर्चाने दोन फिरत्या खुर्च्या देण्याचे मान्य केले त्यांचे शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच शाळेमध्ये लाँन टाकण्यासाठी सर्व सदस्यांनी होणारा खर्च करण्याचे मान्य केले.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी ठरलेल्या प्रथेप्रमाणे सहल नेणार असल्याचे या वेळी जाहीर केले.