धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज २००६/२००८ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज २००६/२००८ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा!!
तब्बल १८ वर्षांनी आले एकत्र!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज २००६/२००८ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ११ डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मा.प्राध्यापक कडू व्ही.सी. सर आणि विद्यालयाचे प्राचार्य शेडकर सर,गाढवे सर,गायकवाड टी.एन.सर,भोर बी.बी.सर,भोर आर.सी.सर तसेच
धामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.रेश्माताई बोऱ्हाडे,मा.सरपंच सागर जाधव,पत्रकार अंकुश भूमकर, शिरदाळे मा.उपसरपंच मयूर सरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व मित्रांनी अठरा वर्षांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला. यावेळी सर्वासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी माजी विद्यार्थ्या यांच्या कडून शाळेसाठी दोन कपाट भेट म्हणून देण्यात आले.