धामणी (ता.आंबेगाव) येथील कलाप्रेमी, कलाकार श्री. दिनकर रोकडे यांचा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा पाहण्यासाठी कलाप्रेमिंची गर्दी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील कलाप्रेमी, कलाकार श्री. दिनकर रोकडे यांचा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा पाहण्यासाठी कलाप्रेमिंची गर्दी!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील कलाप्रेमी, कलाकार श्री. दिनकर रोकडे यांचा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा पाहण्यासाठी कलाप्रेमिंनी गर्दी केली आहे.
धामणी गावचे आदर्श व्यक्तीमत्व श्री. दिनकर रोकडे यांच्या घरचा गणपती समोर नेहमी काहीतरी वेगळ आणि आकर्षक देखावा सादर केला जातो. तस पाहिले गेले तर दिनकर रोकडे हे सुद्धा कलाप्रेमी व कलाकार आहेत.
ते दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडांचा देखावा सादर करत असतात. याहीवर्षी संगितरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांचा लोकनाट्याचा देखावा साकारला आहे.
धामणी गावाच्या सुप्रसिद्ध श्री. कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा यात्रेच्या निमित्ताने जुन्या काळी सतत कित्येक वर्षे संगितरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होत होता.धामणी गावावर स्व. दत्ता महाडीक पुणेकर यांचे विशेष प्रेम होते.धामणी गाव कलावंतांची भुमी आहे.
श्री.दिनकर रोकडे याच्या घरी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ हा देखावा पाहण्यासाठी सदिच्छा भेट व श्री.दिनकर रोकडे याचा साईकृपा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या निमित्ताने श्री.वसंतराव जगताप (चेअरमन साईकृपा पतसंस्था बेल्हे), श्री.संजय विश्वासराव (खजिनदार साईकृपा पतसंस्था), श्री.संजय महाडीक, श्री.राकेश डोळस, मा. उपसरपंच. श्री.दत्तातशेठ लामखडे,श्री.सागर जाधव (लोकनियुक्त सरपंच धामणी) अक्षयराजे विधाटे (उपसरपंच धामणी)श्री.अंकुश भुमकर (मा.सरपंच) श्री.पमाजी पंचरास (प्रसिद्ध ढोलकीपटू)श्री.संतोष पंचरास (बलुतेदार संघटना धामणी) श्री.माधव बोऱ्हाडे (सामाजिक कार्यकर्ते) श्री.सचिन ससाणे,श्री.सुधाकर जाधव (पोलीस पाटील) श्री.मंगेश रोकडे सर,श्री. भुषण रोकडे, श्री.धनंजय रोकडे,श्री.ओंकार रोकडे उपस्थित होते.
दिनकर रोकडे यांच्या घरी गणपती पुढील देखावा पाहण्यासाठी भाविक व रसिकांची मोठी गर्दी होत आहे.