जागोजागी वर आलेली विद्युत केबल खराब होऊन अपघाताची शक्यता, विजवाहिनी केबल पाईपद्वारे खोलवर पुरून बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी

जागोजागी वर आलेली विद्युत केबल खराब होऊन अपघाताची शक्यता,विजवाहिनी केबल पाईपद्वारे खोलवर पुरून बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी
मंचर-जुना खरेदी विक्री संघ मंचर येथील अमरनाथ हाईटस लगत महावितरण कंपनीची दोन वर्ष पूर्वींची डी.पी.अस्तित्वात असून नवीन १ डी.पी.उभारण्याचे काम सूरु आहे.या तिन्ही डी.पी.साठी मंचर सुपर मार्कंट पाठीमागील डी.पी.पासून महावितरण कंपनीने ११ केव्ही (११००० व्होल्ट) ची भूमिगत केबल द्वारे वीज पुरवठा केला आहे.
सदर वीजपुरवठा करतेवेळी खोलवर गाडून पाईप मध्ये केबल टाकून काम करण्याऐवजी जमिनीपासून सुमारे अर्धा फुट खोलवर कोणत्याही पाईप मधून न टाकता उघड्यावर केबल पुरुन आणल्यामुळे मंचर नगरपंचायत यांनी नवीन रस्त्याचे काम सुरु करताना दोन वेळा अर्ध्या फुटावर असुरक्षित केबलला जे.सी.बी.च्या दाताचा धक्का लागून केबल खराब होऊन येथील रहिवाश्यांना ऐनवेळी मोहरमच्या दिवशी अंधारात राहावे लागले होते.शिवाय उच्च दाब ११००० व्होल्टची केबल असल्याने त्याचा धक्का बसून जीवित हानी होता होता राहिली होती.
याबाबत नगरपंचायत आणि ग्रामस्थ यांनी महावितरण कंपनीकडे लेखी पाठपुरावा करुनही अध्याप सदर भूमिगत वीजवाहिनी केबल खोलवर पाईप मध्ये पुरुन टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
या आधी ज्या कंञाटदाराने हे धोकादायक काम केले आहे त्यामुळे मंचर सुपर मार्केंट पाठीमागील रस्त्यावरील 200 मीटर उघड्यावरील केबल वरुन सर्व दोन चाकी व चारचाकी व ५०० रहिवाशी लोक आजूबाजुला राहातात.व जिल्हा परीषद शाळा शेजारी असल्यामुळे शाळेतील लहान मुले त्या रस्त्याने येत जाताना हात लावत असतात. गावात येण्यासाठी तो रस्ता असल्यामुळे दररोज दोन ते तीन हजार लोकांची रस्त्यावरुन ये जा सुरु असल्याने कोणताही विद्युत अपघात होऊ शकतो त्याची सर्वस्वी जबाबदारी पुर्वींचा कंञाटदार आणि विद्युत महावितरण कंपनी यांची राहिल.
त्यामुळे सदर कंञाटदाराने सदर उघड्यावरील वीज वाहिनीची केबल नवीन टाकून ती केबल पाईप द्वारे खोलवर पुरुन काम पूर्णं करुन देण्याची मागणी मंचर नगरपंचायत व ग्रामस्थांकडून होत आहे.
विद्युत महावितरण कंपनीने लवकरात लवकर काम पुर्णं करुन देण्याची दखल घ्यावी. अन्यथा कामाची दखल न घेतल्यास मंचर शहराचे युवा नेते मा.ग्रामपंचायत सदस्य मा.स्वप्निल (बाबा) बेंडे पाटील यांनी ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.