आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बु.गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

कु.श्वेता शालन सुखदेव करंडे हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड!!

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बु.गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

कु.श्वेता शालन सुखदेव करंडे हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सन 2022 च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील कु.श्वेता शालन सुखदेव करंडे उत्तीर्ण झाली आहे.ती काठापुर बुद्रुक गावातील पहिली महिला अधिकारी आहे. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबातील कु.श्वेता सुखदेव करंडे राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या 2022 च्या पी.एस.आय परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.ग्रामीण भागात राहुन खडतर प्रयत्न करून श्वेताने हे यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामधून तिचे कौतुक होत आहे.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा झाप येथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण झाले.त्यानंतर आठवी ते 10 वी चे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव,तर 11 व 12 वी चे शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक,येथे झाले.तर दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान, त्यानंतर दिलीपराव वळसे पाटील सीनियर कॉलेज निमगाव सावा या ठिकाणी द्वितीय व तृतीय वर्षाचे विज्ञान शाखेतुन शिक्षण घेतले. 2018 साली पदवी प्राप्त केली.त्याआधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. घरीच हा अभ्यास तिने केला.मागील काही दिवसापासून शिरुर येथील ज्ञानसागर अभ्यासीका लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवले.तिला अभ्यासात शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

याआधी दोन मार्काने तिला अपयश आले होते.परंतु खचुन न जाता तिने यश मिळवले आहे. शेतकरी आई वडील अशी कौटुंबिक परिस्थिती असताना मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे. स्वेताचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.