आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली!!

कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली!!

मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळासाठी विस्कळीत
शहापूर – गेल्या चौवीस तासांपासून इगतपुरी व कसारा घाटात मुसळधार पाऊस असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार (दि.३) रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली.ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली आहे. यामुळे मुंबईला जाणारी अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. विषेश म्हणजे काही मिनीटांपूर्वीच या रेल्वे लाईनवरून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईला रवाना झाली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे व ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यामुळे अपलाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.