आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लोणी(ता.आंबेगाव) येथे लर्निंग लायसन्स कॅम्पचे उदघाटन!!

लोणी येथे लर्निंग लायसन्स कॅम्पचे उदघाटन!!

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी लोणी येथे या शिबिराला सुरवात करण्यात आली.


सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील,मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सुचनेने तसेच मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.उपसरपंच रामदासजी वळसे पाटील यांच्या विशेष पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील गरजू वाहन धारकांना याचा फायदा व्हावा तसेच जास्तीत जास्त लोकांचे लायसन्स निघावेत ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल बाराशे वाहन चालकांनी नावनोंदणी केली त्यांचे पहिले लर्निंग व नंतर कायमस्वरूपी लायसन्स काढून देण्यात येणार आहे.


यावेळी खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष मा.अनिलशेठ वाळुंज,शरद सहकारी बँकेचे संचालक मा.अशोकशेठ आदक पाटील,राष्ट्रवादी गण प्रमुख बाळशीराम वाळुंज,आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मयुर सरडे,युवक गट अध्यक्ष सुमित वाळुंज,पोंदेवाडी उपसरपंच संदीप पोखरकर,धामणी सोसायटी व्हा.चेअरमन दीपक जाधव,शिरदाळे मा.सरपंच मनोज तांबे,संतोष कुरकुटे, लौकिक खंडागळे,चंद्रकांत गायकवाड,मा.उपसरपंच अनिल पंचरास,आण्णा पोखरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर RTO चे अधिकारी अभिषेक काळे,अथर्व मेहेर,आकाश लाडके हे संपूर्ण कामकाज पाहणार आहेत.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.