आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद!!

रक्तदात्यास मोफत पाच लाखांचा विमा, हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप!!

नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद!!

रक्तदात्यास मोफत पाच लाखांचा विमा, हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप!!

नारायणगाव पोलीस स्टेशन मिटींग हॉल येथे सामाजिक बांधिलकी म्हणून दि.२७ रोजी सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग श्री रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिरासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शिबिरात ४२५ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. सदर रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनकडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यु 5 लाख रुपयापर्यंत मोफत अपघाती विमा तसेच प्रत्येकी 1 हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सदर रक्तदान शिबिरात रियाज हमीदभाई मोमीन यांनी सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले.

तसेच, दिव्यांग नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, शासकीय अधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

सदर रक्तदान शिबिरासाठी अमित बेनके, आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, माऊली खंडागळे,योगेश उर्फ बाबू पाटे, सुरज वाजगे,आकाश बोरकर, अविनाश डावखर,गणेश वाजगे, सचिन थोरवे,प्रमोद खांडगे, योगेश तोडकरी,डॉ. पंजाबराव कथे,डॉ. पिंकी कथे,डॉ. लहु खैरे,श्री रमेश बिराजदार,आकाश जगताप,अमोल नरवडे, संतोष साठे,भास्कर गाडगे,दादामिया पटेल,ज्ञानेश्वर शिंदे, निवृत्ती काळे,पोलीस पाटील,नारायणगाव हद्दीतील सर्व पत्रकार बंधू ,सरपंच,महिला दक्षता समितीच्या सदस्या,ग्राम सुरक्षा दल,कथे डायग्नोस्टिक सेंटर व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टीम चे पदाधिकारी, पुना ब्लड सेंटर स्टाफ,न्यू इंडिया इन्शुरन्स चे सर्व अधिकारी कर्मचारी,तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोलीस उपनिरक्षक विनोद धुर्वे सनिल धनवे, जगदीश पाटील व सर्व अंमलदार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.