वळती (ता.आंबेगाव) येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बा विठ्ठला!! गाण्याचे चित्रीकरण पूर्ण!!
गाण्याला लाखो लोकांची पसंती!!

वळती (ता.आंबेगाव) येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बा विठ्ठला!! गाण्याचे चित्रीकरण पूर्ण!!
गाण्याला लाखो लोकांची पसंती!!
आषाढीची वारी सुरू झाली असून सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बा विठ्ठला!! या गाण्याचे चित्रीकरण वळती (ता.आंबेगाव) या ठिकाणी करण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील कलाकारांनी हे गाणे बनवले आहे.
वळती (ता.आंबेगाव) या ठिकाणी नुकतेच बा विठ्ठला!! या गीताचे चित्रीकरण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आले.
मावळती प्रोडक्शन व स्वराज्य कलाकार महासंघाच्या माध्यमातून या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून गीत विशाल करंडे,गायक चंदन कांबळे, संगीत मोनु अजमेरी यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण महेश शेवाळे यांनी तर संकलन वजीर शेख यांचे आहे.
या गाण्यामध्ये रामदास करंडे यांनी मुख्य भुमिका केली असुन,वळती, रांजणी येथील नागरिकांनी यामध्ये काम केले आहे.
संतोष वाघ,उत्तम भोर,शशिकांत वाघ,कोंडीभाऊ भोर,दत्तात्रय जांभळे, गोरक्ष टाव्हरे,प्रकाश टाव्हरे,श्यामकांत लोंढे,सुखदेव गांजवे,खंडू लोखंडे,अंकुश लोंढे, बाळशीराम भोर, युवराज गायकवाड,मुरलीधर शिंदे, लक्ष्मण लोंढे,मारुती पडघमकर,मंगेश क्षीरसागर,सुनिता क्षीरसागर,कौसल्या लोंढे समस्त ग्रामस्थ रांजणी वळती स्वराज्य कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य यात सहभागी झाले आहेत.