आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अरे बापरे!बिबट्याने चक्क चार चाकी कारचा पाठलाग करत केला हल्ल्याचा प्रयत्न!!

अरे बापरे!बिबट्याने चक्क चार चाकी कारचा पाठलाग करत केला हल्ल्याचा प्रयत्न!!

आंबेगाव तालुक्यातील बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही.अवसरीहून  योगेश वाघ हे घरी जात असताना बिबट्याने चक्क त्यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करत वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी तातडीने पिंजरा बसविण्याची मागणी अवसरी बुद्रुक गावच्या सरपंच सारिका हिंगे यांनी केली आहे.

काल रात्री साडेदहाच्या सुमारास योगेश वाघ हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना, अवसरी बुद्रूक ते टाव्हरेवाडी रस्त्यावर बैलगाडा घाटाच्या जवळ त्यांना बिबट्याची मादी व तीन बछडे आडवे गेले.घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आपले वाहन जागीच थांबवले. वाहन थांबल्यानंतर बछडे झाडीत पळून गेले. बिबट्या मादीने मात्र गाडीवर हल्ला करत तीचा पाठलाग केला.मात्र गाडीच्या प्रखर उजेडात मादीसुद्धा झाडीत पळून गेली. हे सर्व दृश्य पाहून योगेश वाघ घाबरून गेले.

हाच रस्ता टाव्हरेवाडी गावाकडे जाणारा असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. शाळेत येणाऱ्या- जाणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात फिरत असणाऱ्या बिबट्यांमुळे नागरिकांना धोका होऊ शकतो म्हणून या परिसरात तत्काळ पिंजरा बसविण्याची मागणी सरपंच सारिका हिंगे व उपसरपंच अनिल हिंगे व स्थानिकांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.