आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पारगाव (ता.आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी!!

पारगाव (ता.आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी!!

पारगाव (ता.आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय पारगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत.बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे,महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांचे हे योगदान समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे ग्रा.स. किरण ढोबळे यांनी सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच नितीन ढोबळे, शरद बँक संचालक दौलतभाई लोखंडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली अस्वारे,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या सौ.रोहिणीताई बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्या अंकिताताई लोखंडे,ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य विरेद्र ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे, उद्योजक सचिनशेठ देवडे,सागर लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.