आरोग्य व शिक्षणराजकीय

पिंपळगाव(खडकी) येथे भीमाशंकर महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते ,आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.प्रमिला वाळुंज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न!!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे स्थापन झालेल्या भीमाशंकर महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार ॲड.शहाजी बापू पाटील तसेच आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.प्रमिला वाळुंज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

यावेळी बोलताना मा.खासदार आढळराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. भीमाशंकर महिला ग्रामसंघात सहभागी असणाऱ्या महिला बचत गटातील महिलांना आगामी काळात केंद्र व राज्य सरकार तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून पतपुरवठा तसेच विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भीमाशंकर महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ.वर्षा सचिन बांगर यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी दिली. ग्रामीण भागातील महिलांना उमेद मुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले असून गावातील अनेक महिलांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पतपुरवठा उपलब्ध झाल्याने महिला शिवणकाम, बेकरी उत्पादने, बॅग – पर्स मेकिंग, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधली जात असल्याचे सांगून महिलांनी निर्मिती केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकार अथवा पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिला अस्मिता उद्योग भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कार्यक्रम प्रसंगी करताच मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी मा.आमदार शरददादा सोनवणे, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे निजी सचिव संदीप पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष अरुण गिरे, युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, भाजपचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ.मालती थोरात, मा.सरपंच सौ.प्रीती थोरात, उमेद अभियानाचे आंबेगाव तालुका समन्वयक त्रिंबक पारासुर, सी.आर.पी. सौ.कविता पोखरकर, भीमाशंकर महिला ग्रामसंघाच्या सचिव सौ.पूजा बांगर, कोषाध्यक्ष सौ.सोनाली पोखरकर, लेखनिक सौ.माधुरी बांगर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, सौ.सुजाता पोखरकर, सौ.मोहिनी बांगर यांच्यासह भीमाशंकर महिला ग्रामसंघातील महिला पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.