धामणी स्मशानभूमी सुधारणेसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर-मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

धामणी स्मशानभूमी सुधारणेसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर-मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील
धामणी (ता.आंबेगाव) येथील स्मशानभूमी सुधारणेसाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मार्फत स्मशानभूमी सुधारणेसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला असून सदर कामाचे भूमिपूजन जेष्ठ पत्रकार ॲड. विठ्ठल जाधव , रोटरी क्लब ऑफ भोसरी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील गावठाण स्मशानभूमी अध्यावत करण्यासंदर्भात ग्रामपंचायत ने पाठपुरावा केला होता.आढळराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धामणी स्मशानभूमी नविन बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केला.
या वेळी उद्योजक शांताराम जाधव , भिमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंत जाधव , सरपंच रेश्मा बोऱ्हाडे , मा.सरपंच सागर जाधव , उपसरपंच संतोष करंजखेले , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितिन जाधव , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश कदम , ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोडे , अक्षय विधाटे , प्रतिक जाधव , मा.ग्रा.प. सदस्य आनंदराव जाधव ,बलुतेदार संघटना अध्यक्ष संतोष पंचरास , अमोल जाधव , महिपत बढेकर , बाबाजी बढेकर , खुशाल जाधव ,लक्ष्मण सोणवने , बबन जाधव , योगेश जाधव, कॉन्ट्रॅक्टर देविदास करंजखेले उपस्थित होते .