घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट !!

घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट !!
————————————————————————
शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख संतोष डोके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला भेट दिली.
भेटीदरम्यान आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती घेण्यात आली. मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आदिवासी विकास मंत्री विजयराव गावित यांनी नुकतेच खेड तालुक्यातील कोहिंडे, चिखलगाव, टोकावडे, आंबेगाव तालुक्यातील गोहे, तेरुंगण, राजपूर, आहुपे, घोडेगाव(इंग्रजी माध्यम) व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर, अंजनावळे, सोनवळे, खटकाळे, सोमतवाडी या आदिवासी आश्रम शाळांना आदर्श शाळेत रूपांतरित करण्यासाठी मान्यता दिली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने या माध्यमातून आश्रम शाळेंचा चेहरामोहरा बदलवून आधुनिक व डिजिटल शिक्षणाचे दालन विद्यार्थ्यांना खुले होणार आहे. याशिवाय आदिवासी भागातील विद्यार्थीनींसाठी लवकरच तेरुंगण येथे कन्या शाळा सुरु केली जाणार आहे असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील व श्रीमती विजया पंढुरे यांनी दिली.
बैठक प्रसंगी शिवसेना शिष्ठमंडळांने आदिवासी वसतिगृहात विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी केली. आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महादेव कोळी, ठाकर, कातकरी या आदिम जमातीतील मुलांचा सर्वे करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणले जावे व प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेत सांगणक शिक्षक, लायब्ररी, गेस्ट लेक्चर आयोजित करावे अशी मागणी केली.
जुन्नर-आंबेगाव व खेड तालुक्यातील अनेक गावांनी ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विविध विकासकामांना निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केले असतानाही संबंधित अधिकारी नकारात्मक अहवाल सादर करीत असल्यामुळे निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील काही गावांनी २ वर्षांपासून विज कनेक्शन साठी प्रस्ताव दिले आहेत ते तात्काळ मंजूर व्हावेत. कातकरी, ठाकर समाजासाठी केंद्र शासनाची घरकुल योजना आहे परंतु हक्काची जागा उपलब्ध नसल्याने लाभार्थी वंचित राहत आहेत त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना गायरान जागेत घरासाठी जागा उपलब्ध होणेकामी जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव दाखल करावा. जुन्नर येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या आदिवासी भवन बांधकामास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. जुन्नर – खेड व आंबेगाव येथील आदिवासी विद्यार्थी, युवक, युवतींना व्यवसायभीमुख प्रशिक्षण सुरु करावे. कातकरी समाजाला डिंभे धरण क्षेत्रात मासे मारी करता यावी यासाठी आपल्या कार्यालयाकडून प्रस्ताव द्यावा जेणेकरून अंतिम मजुरीसाठी मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असे याप्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके व शिवसेना पदाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक शरद काळे, आदिवासी विकास निरीक्षक श्रीमती छाया ढूमणे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुरगुडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल अंकुश, अशोकराव थोरात, शांतराम काळे, हरिभाऊ आवटे, ढाकाळे गावचे सरपंच धोंडिभाऊ लांघी, मा.सरपंच राजू भारमळ, रवींद्र डामसे यांच्यासह विविध गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.