आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल!!

अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल!!
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे दारू विक्रीवर पारगाव पोलिसांनी कारवाई केली असून १,०७०/- रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई दिनांक १/१२/२०२३ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी महीला पोलीस अंमलदार निशा गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदा लेखराम शाहू (वय ५५ रा. निरगुडसर ता. आंबेगाव ) या महिलेवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मडके पुढील तपास करत आहे.