आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर शाखेत चौदस पौर्णिमा उत्सव संपन्न!!


शहापूर तालुक्यातील मोहिली- अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने,संत परिवाराच्या प्रेरणेतून,संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशीसाहेब,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने चौदस पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन आज दि.११/४/२०२५ दुपारी :- १२ ते १ या वेळेत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाला उपस्थित व्यवस्थापक सामान्य प्रशासक श्री. उल्हास पाटील सर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या हस्ते आत्मरूप प्रतिमेचे पूजन करून सुंदर भजनाने सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात संगीत विभागातून सुयोग खंडागळे यांनी विविध भजने सादर केली.
या कार्यक्रमाला उपस्थित आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे सर्व विद्यार्थी व आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक आत्मध्यान केले. कार्यक्रमात श्री.उल्हास पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत चौदास पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आणि ध्यानाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना सद्विचार, साधना आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच श्री. पंकज दहिंजे सर यांनी ध्यान व अध्यात्म यावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गायन भजनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि संस्कृतीचे दर्शन घडवले.

या कार्यक्रमाची सांगता आरतीने करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना व्यापारी मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रम आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल चे सर्व कर्मचारी, वसतिगृह विभाग,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांमुळे यशस्वीरित्या संपन्न झाला.



