डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे वतीने आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन!!
डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे वतीने आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन!!
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा में अध्यक्ष स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण श्री. सचीन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान स्वच्छता मोहिम. वृक्षा रोपन व संवर्धन, रक्तदान, आरोग्य शिबीर व विहीर, तलाव व जलसाठे स्वच्छता व गाळ काढणे यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे. याचाच भाग म्हणून श्री. गणेश उत्सवा निमीत्त वापरण्यात येणाऱ्या निर्माल्या पासून नदी प्रदुषण होऊ नये यासाठी निर्माल्य संकलन ही मोहीम संपुर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. यासाठी आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन करण्यात आले.
श्री. गणेश विसर्जनाचे वेळी भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात टाकू नये यासाठी वडगांव काशिंबेग येथे २७ व चांडोली खुर्द येथे २९ प्रतिष्ठानचे स्वयंसेवक अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटावर उपस्थित होते. तसेच निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर ट्रॉली ची व्यवस्था विसर्जन घाटावर करणेत आली होती. याठिकाणी प्रत्येकी दीड टन प्रमाणे जवळपास तीन टन निर्माल्य संकलन करण्यात आले. जमा झालेल्या निर्माल्यातून खत निर्माती केली जाते.
प्रतिष्ठानचे वतीने आंबेगाव तालुक्यात हा उपक्रम श्री गणेश उत्सवात काही वर्षापासून राबविला जात आहे. सर्व श्री. गणेश मुर्तीचे विसर्जन होईपर्यंत प्रतिष्ठानचे स्वयंसेवक विसर्जन घाटावर उपस्थित होते. याप्रसंगी या उपक्रमास विसर्जनासाठी आलेले सर्व गणेश भक्तांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.