खड्ड्यांच्या गर्दीत हरवून गेला लोणी – मंचर रस्ता!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी -शिरूर आणि आंबेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे लोणी – मंचर रस्ता!! सध्या हा रस्ता खड्ड्यांच्या गर्दीत हरवून गेला आहे.
लोणी ते मंचर या रस्त्यावर जारकरवाडी ते धामणी खंडोबा फाटा या मार्गावर साधारण तीन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने सर्वच लहान मोठ्या वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे.हे रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत बूजवावेत अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहन चालकांनी केली आहे.

लोणीहून जारकरवाडी मार्गे मंचरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असून या रस्त्यावर लहान मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.जाधव मळा, भोजनदरा,धामणी खिंड,घोडकाना, निरगुडसर फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्यावरील खड्डयां संदर्भात वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली असून अनेक दुचाकी चालकांना कंबर व मानेच्या मनक्याचे आजार जडले आहेत.याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालकांनी केला आहे.