आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक आले फुलोऱ्यात!!
बदलते हवामान ठरतेय बळीराजाची डोकेदुखी!!

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक आले फुलोऱ्यात!!
बदलते हवामान ठरतेय बळीराजाची डोकेदुखी!!
निरगुडसर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक सध्या फुलोऱ्यात आले आहे. मात्र धुके, ढगाळ हवामान यामुळे फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यात फवारणी साठी लागणाऱ्या सर्वच गोष्टींचा भांडवली खर्च वाढला असल्याने बळीराजाची डोकेदुखी वाढली आहे.
घोडनदी, मीना नदी, डिंभे धरणाचा उजवा कालवा यामुळे आंबेगाव तालुक्यात बारमाही पाणी उपलब्ध आहे. ज्यामुळे तालुक्यातील बहुतांशी गावात नगदी पिकांची नेहमीचं रेलचेल असते. बटाटा, टोमॅटो, गवार, भेंडी, ढोबळी मिरची, ऊस, कोबी,फ्लॉवर आदी पिके शेतकऱ्याला उतपन्न मिळून देत असतात. मात्र सध्या या पिकांसाठी लागणारा भांडवली खर्च ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण खूप असल्याने बळीराजाची बहुतांशी पिके शेतातच सडून गेली आहेत. ज्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आला आहे.सध्या बटाटा पीक जोमात आले आहे जे बळीराजाला चार पैसे मिळून देऊ शकतो फक्त हवामान आणि बाजारभाव यांनी साथ द्यायला हवी असे मत बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केले.