आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा,धामणी घाट रस्त्याची संरक्षक जाळी झाली गायब!! उरलेत फक्त लोखंडी खांब!!

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा,धामणी घाट रस्त्याची संरक्षक जाळी झाली गायब!! उरलेत फक्त लोखंडी खांब!!
आंबेगाव तालुक्यातील धामणी, पहाडदरा घाटाच्या संरक्षक कठड्यांची लोखंडी जाळी गायब झाली आहे. ज्यामुळे वळणावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणी,धामणी,पहाडदरा, खडकवाडी, वडगावपीर,मांदळेवाडी,शिरदाळे या परिसरातील शेतकऱ्यांसाठी मंचर या ठिकाणी जाण्यासाठी-येण्यासाठी पहाडदरा घाट रस्ता हा जवळचा मार्ग आहे.शेतमाल वाहतूक,प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना या जवळच्या मार्गामुळे प्रवास सोपा झाला आहे. घाट रस्त्यावरील वळणावर अपघात होऊ नये यासाठी संबंधित विभागाने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. मात्र या संरक्षक कठडे ला बसवलेली लोखंडी पत्रे मात्र गायब झाले आहेत.
या घाट रस्त्यावर नियमितपणे वाहतूक सूरू असते. अवसरी बाजुला रस्ता आधीच नादुरुस्त झालेला आहे. अजून त्याचीच दुरूस्ती झालेली नाही. त्यात संरक्षक कठडे ही नादुरुस्त झाल्याने या मार्गावरील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.