विज्ञान म्हणजे एकाच कृतितून अनेक प्रयोगांचे सादरीकरण-जेष्ठ विज्ञान साहित्यिक विनय र र.

विज्ञान म्हणजे एकाच कृतितून अनेक प्रयोगांचे सादरीकरण:जेष्ठ विज्ञान साहित्यिक विनय र र.
पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२२-२३ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ विज्ञान साहित्यिक व मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष विनय र र यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद राव लेंडे,पंचायत समिती सदस्या सौ.अनघाताई घोडके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके,गट विकास अधिकारी शरद चंद्र माळी,गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,बेल्हे बिट विस्तार अधिकारी आशा ताई धांबोरी,पंचायत समिती सदस्य शामराव माळी,सावरगाव बिट विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे,तितर मॅडम,प्रदीप आहेर,राजू शेठ आहेर,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल,उपाध्यक्ष यशवंत दाते,मुख्याध्यापक संघांचे महेंद्र गणपुले,तबाजी वागदरे,अशोक काकडे,एच पी नरसुडे,तानाजी वामन,रघुनाथ पवार,अशोक शेठ सोनवणे,लहुशेठ गुंजाळ,राजुरी गाव च्या सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे,अणे गावच्या सरपंच सौ.प्रियांका ताई दाते,अशोक शेठ घोडके,अशोक शेठ गुंजाळ,रंगनाथ शेठ भांबेरे,दत्तात्रय लामखडे,निलेश लामखडे,चंद्रकांत ढगेबाबाजी शिंदे पांडुरंग गगे,खंडू पाटिल,गोरक्षनाथ शिंदे,एम.डी.पाटिल शिंदे,शाकीर चौगुले,रंगनाथ पाटील औटी,गौरव घंगाळे,आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विनय र र म्हणाले कि,विज्ञानात प्रश्न पडले पाहिजेत.विज्ञान हे फक्त वस्तुत नाही,प्रयोगशाळेत नाही तर,जिथे पहाल तिथे विज्ञान आहे.एकाच कृतीतून अनेक प्रयोग आपल्याला सादर करता आले पाहिजे.त्यासाठी निरीक्षण शक्ती,निरीक्षण कौशल्य,परीक्षण शक्ती या सर्व गोष्टींची गरज आहे.पर्यावरणातील प्रयोग आपल्याला शोधता आले पाहिजे.एका प्रश्नाला अनेक उत्तरे विज्ञानात आहेत.विज्ञानावर श्रद्धा ठेवा हे वाक्य अवैज्ञानिक आहे,तर विज्ञानावर शंका घ्या हे वाक्य वैज्ञानिक आहे.ज्ञान हे कमी होत नाही,वाटल्याने वाढते.
जिल्हा परिषद सदस्य शरद राव लेंडे म्हणाले कि,जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला एखाद्या कार्यक्रम घ्यायचा असेल तर समर्थ शैक्षणिक संकुला मार्फत तो कार्यक्रम पूर्णत्वास जातोच.अचूक नियोजन आणि खर्चाची तमा न बाळगता सूत्रबद्धरीत्या सर्वच कार्यक्रम या संकुलामध्ये संपन्न होत असतात.
या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये प्रकल्प स्पर्धेसोबतच संगणकीय सादरीकरण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,भित्तिपत्रक (पोस्टर मेकिंग) स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा,कौन बनेगा विज्ञानपती स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्याचप्रमाणे
आगस्त्या फाऊंडेशन,आयुका द्वारे दिवसभर विज्ञानवाहिनी मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक आणि सायंकाळी दुर्बीनी द्वारे अवकाश दर्शन देखील दाखविण्यात आले.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने यामध्ये दुर्मिळ नाणे व शस्त्रास्त्रे,छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांचे वतीने मोबाईल म्युझियम ऑन व्हील्स बस,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन,अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड चे माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.संवाद विज्ञान लेखकांशी,गणितीय गमती-जमती व गप्पा गणित संशोधकांशी या विषयांवर आधारित तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,सर्व विभागांचे प्राचार्य व विभागप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार प्रा.संजय कंधारे यांनी मानले.