आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शाळा पूर्व तयारी मेळावा २०२४-२०२५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे(पारगाव)संपन्न!!

शाळा पूर्व तयारी मेळावा २०२४-२०२५
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे(पारगाव)संपन्न!!

प्रतिनिधी- समीर गोरडे

शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिंगवे इयत्ता पहिलीत दाखल पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा खूप प्रभावी असून यामुळे मुलांना अंगणवाडीतून शाळेत येण्यापूर्वीच शाळेविषयी आवड झालेली पाहायला मिळाली.


याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेचा विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन विद्यार्थ्यांना कुमकुम तिलक करून शाळेमध्ये स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासाची, चाचणी विविध खेळ व उपक्रमांची माहिती देण्यात आली.


याप्रसंगी पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी ,पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक आदि मान्यवरांच्या उपस्थित होते व शाळा पूर्व मेळाव्यास वर्गशिक्षिका योगिता बुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळा पूर्वतयारी कार्यक्रमासाठी स्वाती सोनवणे,सुषमा कदम,नवनात सिनलकर,धनंजय पवार,राजेंद्र बोंबे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लोहकरे यांनी केले. शाळा पूर्वतयारीचे नियोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येथे,उपाध्यक्ष गोरक्ष जगताप यांनी केले. आभार जालिंदर पोंदे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.