धामणी (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावातील विविध विकासकामांचे मा.खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले निवेदन!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावातील विविध विकासकामांचे मा.खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले निवेदन!!
मकरसंक्रांती च्या शुभमुहूर्तावर धामणी गावासाठी विविध विकासकामांचे निवेदन मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. त्याचप्रमाणे धामणी येथील बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा बंद केली जाणार आहे त्या संदर्भातही ग्रामस्थांनी आढळराव पाटील यांना निवेदनपत्र दिले. आढळराव पाटील यांनी या विषयाबाबत बँकेच्या प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधला व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन सदर बँक धामणी याच ठिकाणी रहावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
धामणी गावासाठी कधीही निधी कमी पडु दिला जाणार नाही अशी ग्वाहीही आढळराव पाटील यांनी धामणी ग्रामस्थांना दिली.तसेच धामणी ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी संतोष करंजखेले यांची निवड झाल्याबद्दल मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
धामणी गावातील ग्रामपंचायत नविन इमारत करणे, द्रोणागिरी मळा येथे साकव पुल व रस्ता करणे, गवंडी मळा रस्ता करणे , माळीमळा रस्ता करणे, गाढवे मळा रस्ता करणे,शिवाजी विद्यालय रस्ता करणे, गावठाण नविन अंगणवाडी करणे, गवंडी मळा, धनगरदरा, गावठाण नविन डीपी बसवणे ही कामे या कामांचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, मा.सरपंच सागर जाधव, उपसरपंच संतोष करंजखेले,युवानेते अमोल गाढवे, मा.उपसरपंच दत्तात्रय गवंडी, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, शाखाप्रमुख दिपक जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, प्रसिद्ध गाडामालक शरद जाधव, विठ्ठल गवंडी,नामदेव गवंडी किरण गाढवे, दत्ता गाढवे, हरिश्चंद्र गवंडी, दादाभाऊ गवंडी, सत्यजित जाधव, वैभव गवंडी, माधव बोऱ्हाडे, गिरीधर गाढवे, अभिषेक गाढवे उपस्थित होते.