नाशिकरोड येथे अनंत सरोदे यांचे जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ!!

नाशिकरोड येथे अनंत सरोदे यांचे जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ!!
नाशिकचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार, पक्षीमित्र अनंत (बाळा) सरोदे यांची अनोख्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनास आज प्रारंभ करण्यात आला. ताडोबासह विविध व्याघ्र प्रकल्पामध्ये अनंत सरोदे यांनी व्याघ्रांच्या व इतर वन्यजीव प्राण्यांच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.
आज शुक्रवारी शिखरेवाडीतील पासपोर्ट ऑफिसशेजारी असणाऱ्या स्टारझोन मॉलच्या पीएनजी आर्ट गॅलरीमध्ये वन्यजीव छायाचित्रकार, पक्षीमित्र अनंत (बाळा) सरोदे व अनिरुद्ध जाधव यांच्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पू.ना गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक प्रवीना दुसाने मॅडम व वन्यजीव छायाचित्रकार नुरी मर्चंट यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिकरोडकरांसाठी १० ते १४ मे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शिखरेवाडीतील पीएनजी आर्ट गॅलरीत जंगलवारी छायाचित्र प्रदर्शन पेक्षकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून नाशिकरोडकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनंत सरोदे व अनिरुद्ध जाधव यांनी केले आहे. उद्घाटनास पक्षिमित्र अनंत सरोदे, शैला सरोदे यांच्यासह वेद शिंदे, अनिरुद्ध जाधव, दत्तात्रय कोठावदे, आदित्य कोठावदे, रविश जाजू, अभिजित जाधव, अनिल माळी आदी वन्यजीव प्रेमी उपस्थित होते.