आत्मा मालिक शैक्षणिक,क्रीडा संकुलास अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट!!

आत्मा मालिक शैक्षणिक,क्रीडा संकुलास अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट!!
शहापूर (प्रतिनिधी)-शहापूरच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित,शाखा मोहिली – अघई, येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलास अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट देण्यात आली यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, गोपीचंद कदम साहेब, (भा.प्र. से ) अप्पर आयुक्त – आदिवासी विकास विभाग, ठाणे, श्री. राजेंद्रकुमार हिवाळे साहेब – प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ,शहापूर, श्री जगदीश पाटील साहेब – सहायक प्रकल्प अधिकारी ठाणे, श्री बापूराव जाधव साहेब – सहाय्यक प्रकल्प अधिकारी शहापूर, प्रांत.अधिकारी ज्योती कांबळे मॅडम ,सामान्य प्रशासन व्यवस्थापक उल्हास पाटील, एच् आर् विभाग प्रमुख .श्री राहुल जाधव श्री. दत्तात्रय तेलोरे, सय्यद वल्ली, आत्मा मालिक इंटरनँशनल स्कूलचे प्राचार्य श्री. कैलास थोरात , आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँण्ड ज्यूनियर काँलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर,ज्यूनियर काँलेजच्या विभाग प्रमुख सोनी पाशा, प्रा. गोविंद चव्हाण , प्रा. सूर्यकांत नवले आदींसह संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत होते. या कार्यक्रमास आत्मप्रतिमेच्या पूजन,दीपप्रज्वलनाने करण्यात आली.उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले.
आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष, समस्त विश्वस्त मंडळ , स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा शहापूरचे कार्याध्यक्ष श्री. उमेशजी जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने संकुल सुरु आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना शहापूर तालुका प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे साहेब यांनी ध्यान व शिक्षण यांची सांगड घालून आदिवासी विद्यार्थ्यांना या संकुलात घडवण्याचा प्रयत्न केला जातो असे प्रतिपादन केले.
अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे जिल्हा श्री. गोपीचंद कदमसाहेब यांनी प्राचीन गुरुकुल परंपरा व आधुनिक शिक्षण पद्धती यांचे महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जोपर्यंत या संस्थेत आदिवासी विद्यार्थ्यांचा दर्जात्मक विकास होत राहील, तोपर्यंत मी तुम्हाला पाठिंबा देत राहील असेही आश्वासन कदम साहेब यांनी यावेळी दिले. तर आत्मा मालिक ध्यानपीठाचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधवसाहेब यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे श्री. गोपीचंद कदमसाहेब यांच्या संकल्पनेतील विद्यार्थी घडवण्याचे वचन यावेळी दिले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन प्रा. उल्हास पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.