खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे टी.व्हि. एस – श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!!

टी. व्हि. एस – श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!!
टी. व्हि. एस कंपनी यांच्या वतीने ग्रामपंचायत आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी(जिल्हा पुणे) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
TVS कंपनीच्या CSR विभागामार्फत शिरूर, आंबेगाव व खेड या तालुक्यांमध्ये गाव विकासाचे काम चालू आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण,शेती,पशुधन,शिक्षण, आरोग्य, पाणलोट विकास,पर्यावरण व पायाभूत सुविधा या विषयावर काम केले जाते.
महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेच्या माध्यमातून 250 हून अधिक बचत गट चालवले जातात. त्यामध्ये साडेतीन हजारहून अधिक महिलांचा समावेश आहे. ज्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण केले जाते. महिलांचा विकास होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
महिलच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतून खडकवाडी येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. २५० हून अधिक महिलानी या कार्यक्रमात सहभाग घेतला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८ बचत गटांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सोनल भालेराव(वनविभाग आंबेगाव)उपस्थित होत्या.त्यांनी यावेळी पर्यावरण संवर्धन व शेतात काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याविषयी जनजागृती केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून म्हणून सौ.मनिशा सुर्वे उपस्थित होत्या.बदलत्या जीवनशैलीत सकारात्मक विचारांचे असलेले महत्त्व याविषयी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच कॅन्सर सारखा आजारांवर देखील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. कमलताई सुक्रे (सरपंच,खडकवाडी) या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.उषा देशमुख व शुभदा बोरुडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दिपाली कोरडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार सौ संगीता वाळुंज यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी TVS – श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्ट च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.