आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली- अघईत महाशिवरात्री निमित्त सामूहिक ध्यान!!

आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली- अघईत महाशिवरात्री निमित्त सामूहिक ध्यान!!
शहापूर- शहापूरच्या मोहिली – अघईतील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण )संचालित ,आत्मा मालिक ध्यानपीठत परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपाशीर्वादाने समस्त संतपीठ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक ध्यानपीठ महाशिवरात्री निमित्त सामूहिक ध्यान, भजन आयोजन करण्यात आले.
यावेळी आत्म प्रतिमेचे पूजन करून ध्यान सत्राची सुरवात केली. यावेळी संत पिठाच्या संत भारत माता,आत्मा मालिक ध्यानपिठाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब,अनंत गायकवाड ,प्रवीण मोरे,प्राचार्य कैलास थोरात, वसतिगृह व्यस्थापक बिकास रॉय, आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी स्वरंजली ग्रुपने संगीत विशारद सुयोग खडांगळे,व विद्यार्थ्यांनी भजन सेवा सादर केली.प्रमुख उपस्थितीनी महाशिवरात्रीचे माहिती दिली.आत्मा मालिक ध्यानपीठाचे कार्यध्यक्ष उमेश जाधव साहेबनी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.