जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथील झांजुरणेबाबा देवस्थानच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन!!

जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथील झांजुरणेबाबा देवस्थानच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी येथील झांजुरणेबाबा देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीची औचित्य साधून भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
झांजुरणेबाबा देवस्थानच्या माध्यमातून तसेच स्थानिक ग्रामस्थ,सेवेकरी, देणगी,वर्गणीदाते यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात नव्यानेच शंभू महादेवाचे काशी विश्वनाथ स्वरूपाचे मंदिर उभारण्यात आले आहे. शिवलिंग स्वरूपात पिंड, तसेच नंदी मूर्ती देखील विधिवत स्वरूपात बसविल्या आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून हजारो भाविकांनी या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने खिचडी,राजगिरा लाडू यांचा महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला होता. मंदिर परिसरात रात्री होम हवनचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर हा विकासासाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.
या निमित्ताने वडजादेवी प्रासादिक भजनी मंडळ यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने पंचनामाशी बोलताना देण्यात आली.