काठापुर बुद्रूक (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी संपन्न झाला कृषी विद्यापीठाचा अभ्यास दौरा!!

काठापुर बुद्रूक (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी संपन्न झाला कृषी विद्यापीठाचा अभ्यास दौरा!!
काठापूर बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी 70 महिलांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेऊन दापोली कृषी विद्यापीठात असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन माहिती घेतली.
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. हा दौरा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आयोजित केला होता. या ठिकाणी महिलांनी शोभिवंत झाडांची नर्सरी, विद्यापीठ क्रीडांगण ,बेकरी युनिट, बियाणे प्रक्रिया केंद्र, रबर लागवड केलेल्या क्षेत्र, वनस्पतीशास्त्र विभागाने लागवड केलेली वेगवेगळी पिके यांची पाहणी करून माहिती घेतली. त्याचप्रमाणे उद्यानविद्या रोपवाटिकेला भेट देऊन या ठिकाणी आंब्याच्या तीस जातींचे कलम तसेच मसाल्याची पिके या मसाल्याच्या पिकांची माहिती महिलांनी घेतली.
ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून आयोजित या अभ्यास दौऱ्याला गावातील 70 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिलांनी बेकरी युनिटला भेट देऊन बेकरी मध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे यंत्रसामग्री व कच्च्या मालाची माहिती घेतली. उद्यानविद्या रोपवाटिकेला भेट देऊन या ठिकाणी असणाऱ्या आंब्याच्या 30 जातीच्या कलमांची माहिती घेतली. मसाल्याच्या पिकांविषयी महिलांनी माहिती घेतली. रोजच्या वापरातील मसाले हे कोणत्या झाडापासून कसे तयार होतात याविषयी माहिती घेतली. यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या प्रतेक विभागातील व्यक्तींनी विभागाची माहिती महिलांना दिली.
यावेळी सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे ग्रामपंचायत सदस्या विमल करंडे, पुनम करंडे ,ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी,सुनिता मैड यांनी या अभ्यास दौऱ्याचे नियोजन व व्यवस्था पाहिली.