काव्यवाचन स्पर्धेत,कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्वांचे संकल्प चॅरिटेबल फाऊंडेशन इंदोरी चे संस्थापक,अध्यक्ष श्री.जयसिंग हिरे यांनी मानले आभार!!

काव्यवाचन स्पर्धेमध्ये कवी संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येक कवी मनाच्या कवींना व सर्व श्रोत्यांना आणि प्रमुख उपस्थित मान्यवरांना माझे मनापासून आभार तसे पाहिले तर आभार हा शब्द फार तोकडा आहे या तीन शब्दांमध्ये एखाद्या व्यक्तीविषयी ऋण फेडू शकत नाही असे मला वाटते कवितेच्या माध्यमातून प्रत्येकाला एक आनंद देण्याचा जो आपण प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच शब्दात न सांगता येणारा आहे खरंच कवितेला वयाचे बंधन नसते अनेक वयाने ज्येष्ठ असलेल्या परंतु मनाने तरुण असलेल्या तरुण ज्येष्ठ व्यक्तींनी सादर केलेल्या कविता अप्रतिम होत्या. प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी अर्थ दडलेला होता आणि एक स्वच्छंद मनाला व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळवून द्यावे म्हणून हा कवी संमेलनाचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तसे पाहिले तर अनेक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन मी केलेले आहे परंतु कवी संमेलनाचा हा माझा छोटासा प्रयत्न होता कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम छान झाला म्हणून हजार हत्तींचं आत्मविश्वासन बळ देणारा होता कार्यक्रम खूप छान झाला हा शब्द मला नक्कीच प्रेरणा देणार होता बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नम जोशी प्रसिद्ध एकपात्री कलाकार डॉक्टर मधुसूदन घाणेकर प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्री सतीश इंदापूरकर तसेच दूरदर्शन व आकाशवाणीवर निवेदन करणारे माझे परममित्र श्री संजय भारद्वाज माझे मित्र व निवेदक संजय हिरवे यांच्या उपस्थितीमुळे नक्कीच कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाचा कालावधी जरी तीन चार तासाचा जरी असला आपली भेट जरी काही क्षणापूर्ती जरी झाली असली तरी प्रत्येका बरोबर असलेले ऋणानुबंध नक्कीच आयुष्यभर टिकून राहील हा विश्वास नक्कीच मला प्रेरणा देणार आहे नक्कीच आपण येऊन आपण कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद नक्कीच आपणास भविष्यामध्ये काही मदत लागल्यास किंवा आपला सामाजिक विषयावर साहित्य विषयावर कार्यक्रम असल्यास नक्की आपणा सर्वांना बोलवेल सर्वांचे मनापासून आभार!!