आरोग्य व शिक्षण

राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद!!पदवी विभागातून अभिजित हरडे व अक्षय शिंदे अव्वल;तर पदविका मधून सिद्धार्थ औटी व प्रवीण अंबोरे प्रथम!!

राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद!!

पदवी विभागातून अभिजित हरडे व अक्षय शिंदे अव्वल;तर पदविका मधून सिद्धार्थ औटी व प्रवीण अंबोरे प्रथम!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय तिसऱ्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन नुकतेच बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात आळेफाटा येथील सन राईज हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.राहुल गागरे आणि राजुरी येथील सर्वज्ञ हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.स्वप्नील कोटकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,एम बी ए चे डॉ.शिरीष गवळी,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,विभागप्रमुख,प्रा.सचिन दातखिळे,डॉ.विजयकुमार वाकळे,डॉ.कुलदिप वैद्य,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील विविध पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र विद्यालयातून सुमारे ५३८ विद्यार्थ्यांनी या पोस्टर सादरीकरण स्पर्धेमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला.
डॉ.राहुल गागरे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की,वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार्मसीची ची भूमिका अत्यंत महत्वाची व जबाबदारीची आहे.विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नवकल्पनांना यांसारख्या स्पर्धांमधून निश्चितपणे वाव मिळतो व भविष्यामध्ये त्यातून एखाद्या स्टार्ट अप ची निर्मिती होऊ शकते.म्हणून महाविद्यालयीन जीवनामध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
डी.फार्मसी पोस्टर सादरीकरण:-
प्रथम क्रमांक-सिद्धार्थ औटी व प्रवीण अंबोरे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
द्वितीय क्रमांक-आकाश चव्हाण (लाटे दादासाहेब चव्हाण मेमोरियल कॉलेज ऑफ फार्मसी,कराड)
तृतीय क्रमांक-ओम शेवाळे व वैभराज मैद (विशाल इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,आळे)

बी.फार्मसी पोस्टर सादरीकरण:-
प्रथम क्रमांक-अभिजित हरडे व अक्षय शिंदे (अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी,संगमनेर)
द्वितीय क्रमांक-कोमल लटांबळे व अनुजा तट्टू (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
तृतीय क्रमांक-मचाले ऋतुजा मचाले व वैष्णवी शेवाळे (लोकमान्य टिळक इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,खारघर-नवी मुंबई)
पारितोषिक वितरण समारंभ जुन्नर तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट,बेल्हे मंडल कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांकासाठी रु.५०००/-,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक रु.३०००/-,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक रु.२०००/-,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या बक्षिसांचे स्वरूप होते.
या स्पर्धेसाठी डॉ.सचिन कोठावडे,डॉ.किरण कोताडे,डॉ.रामदास पांढरे व प्रा.राहूल वामन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बसवराज हातपक्की यांनी सूत्रसंचालन प्रा.स्वाती आदमाने आणि प्रा.अर्चना चासकर यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.