विद्यार्थ्यांनी अनुभवले जुन्नर चे पर्यटन वैभव!!
दुर्ग संवर्धन,लेणी वाचन,प्राचीन शिलालेख तसेच ऐतिहासिक गोष्टींची घेतली माहिती!!

विद्यार्थ्यांनी अनुभवले जुन्नर चे पर्यटन वैभव!!
दुर्ग संवर्धन,लेणी वाचन,प्राचीन शिलालेख तसेच ऐतिहासिक गोष्टींची घेतली माहिती!!
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस इ इंग्लिश मेडिअम स्कूल च्या शैक्षणिक सहलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला,अंबा अंबालिका लेणी,नाणेघाट,कुकडेश्वर मंदिर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी मार्गदर्शन केले.शिवनेरी किल्ल्यावर पोहचल्यानंतर महादरवाजा पासून ते सर्व सात दरवाजे त्यावर असलेल्या शरभ शिल्प,दरवाजांची रचना,बांधकाम शैली,त्यांचा इतिहास याबाबत विस्तृत माहिती सांगितली.पुढे शिवाई देवीचे मूळ मंदिर त्यामागील इतिहास व तेथे कोरलेली लेणी यांची माहिती दिली.अंबरखाना,जन्मस्थळ,त्याठिकाणी असलेली त्याकाळची खापराची पाईप लाईन,कारंजे,बदामी तलाव,त्यातील दगडांचा वापर कुठे केला या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अंबा अंबालिका लेणी,भूत लेणी,भीमाशंकर लेणी यांचा असलेला दोन हजार वर्षांपूर्वी चा इतिहास त्याबद्द्ल ची माहिती सांगितली.विशेष म्हणजे एकाच दिवसामध्ये विद्यार्थी प्राचीन धम्मलिपी चीअक्षरे ओळखायला व वाचायला शिकली.नंतर नाणेघाट मध्ये गेल्यावर नाणेघाटाच्या निर्मितीचा इतिहास,तेथील रांजण,लेणी,लेण्यांमध्ये कोरलेल्या प्राकृत भाषा व धम्म लिपी चे वाचन करून माहिती दिली.
नाणेघाट च्या कड्यावरून मुलांनी सुर्यास्त होतानाच्या दृश्याचा आनंद घेतला.शेवटी एक हजार वर्षांपूर्वी चा इतिहास असलेल्या हेमांडपंथी कुकडेश्वर मंदिराची व परिसराची माहिती दिली.
संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी शिवरायांच्या चरित्र्यावर आधारित गीते व पोवाडे सदर करून विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. इतिहासाच्या अभ्यासाबरोबर जुन्नर चे नैसर्गिक वैभव विद्यार्थ्यांनी अनुभवले. सदर या शैक्षणिक सहलीचे आयोजन संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे,क्रीडा शिक्षक किरण वाघ,नवनाथ निर्मल,अतिष पायमोडे,सचिन शिंदे,रामचंद्र मते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहलीचे नियोजन केले.