आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु.कॉलेजला मेस्टा बेस्ट स्कूल अवॉर्ड 2024 ने सन्मानित!!

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु.कॉलेजला मेस्टा बेस्ट स्कूल अवॉर्ड 2024 ने सन्मानित!!

भायखेळा येथील शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन घेण्यात आले यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रीय बिल मंजूर संघाचे अध्यक्ष तथा आमदार सचिन आहिर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक मतदार संघ)डॉ संजयराव तायडे पाटील(संस्थापक अध्यक्ष मेस्टा ), प्रा.डॉ नामदेव दळवी(राज्याध्यक्ष मेस्टा),डॉ विनोद कुलकर्णी (मेस्टा सेक्रेटरी)आदी मान्यवराच्या उपस्थितीत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेज मोहिली- अघई तालुका शहापुर जिल्हा ठाणे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेस्टा बेस्ट स्कूल अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले.

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर शाखेतील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेज यांनी दिलेल्या शैक्षणिक वाटचालीसाठी परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादाने , समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व समस्त विश्वस्त मंडळ तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाची सेवा करत असताना संस्थेच्या सेवेत आपल्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य प्रदान करत असताना त्या अनुषंगाने संस्थेने केलेल्या शैक्षणिक कार्याचा आलेख उंचावत असताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेस्टा या संस्थेच्या वतीने उत्तम प्रशासकीय कार्याची दखल घेत मेस्टा बेस्ट स्कूल अवॉर्ड 2024 ने संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. तसेच आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेज प्राचार्य पंकज बडगुजर यांना मेस्टा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड २०२४ व आत्मा मालिकाच्या शिक्षक विजय बैसाने यांना मेस्टा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी आत्मा मालिकाच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे तारपा नृत्य सादर केले. तसेच शहापूरच्या संस्कृती परंपरा यांचे जतन करणारा शहापूर फेस्टिवल 2024 या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तारपा नृत्य सादर करत प्रथम पारितोषिक व योगानृत्यसाठी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळावले.

या वृत्तसमजताच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व स्थानिक व्यवस्थापन समिती कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी प्राचार्य पंकज बडगुजर व उपप्राचार्य शारांगधर बावीस्कर सर यांना शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या या पुरस्काराबद्दल समस्त विश्वस्त मंडळ तसेच स्थानिक समिती सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे संस्थेचे स्थानिक संस्थेचे पदाधिकारी शैक्षणिक संचालक प्राचार्य डॉ.डी.डी शिंदे, संकुलाचे सह.व्यवस्थापक गुलाब हिरे यांच्या वतीने प्राचार्य पंकज बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.