आरक्षण मिळण्याची घोषणा होताच धामणी(ता.आंबेगाव) येथे मराठा समाजाच्या वतीने फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा!!

आरक्षण मिळण्याची घोषणा होताच धामणी(ता.आंबेगाव) येथे मराठा समाजाच्या वतीने फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा!!
एक मराठा,लाख मराठा..!!
आजचा हा विजय आमचे योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्पित!!
आज सकाळी सकाळी सर्वांच्या कानावर मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची बातमी पडली. हे समजताच मराठा बांधवांनी हा आनंद धामणी येथे वरच्या चौकात एकत्र जमत धामणी,शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून आणि घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याचा फायदा आपल्या भविष्यातील पिढीला होणार असून यामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार असून यामुळे मराठ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
आपले नम्र-सकल मराठा समाज धामणी,शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती