अखेर आंबेगाव तालुक्यातील लोणी-धामणीचा गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत झाला समावेश!!

अखेर आंबेगाव तालुक्यातील लोणी-धामणीचा गावांचा दुष्काळी यादीत समावेश!!
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी,धामणी या गावांचा अखेर दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळ आणि पाणीटंचाई पाचवीला पुजलेल्या लोणी धामणी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परस्थिती आहे.
यावर्षी तर खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गणपती उत्सव काळात केवळ एकच पाऊस झाल्याने तात्पुरते हंगामी पाणी उपलब्ध झाले होते.लोणी धामणी आणि परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती म्हणजे दुष्काळ जाहीर झाला आहे. शासनाने पुणे जिल्ह्यातील 31 महसूल मंडळी दुष्काळी म्हणून जाहीर केले यामध्ये पारगाव मंडळाचा समावेश असल्याने धामणी आणि पंचक्रोशीतील सर्व गावांना दुष्काळी सवलतीचा लाभ मिळू शकणार आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात जे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती,पुरंदर सह इंदापूर,शिरूर आणि दौंड या तालुक्यांचा समावेश झाला होता मात्र दुष्काळी असूनही लोणी धामणी परिसराला दुष्काळापासून देखील वंचित ठेवण्यात आले होते. शासनाने दिवाळीच्या मुहूर्तावर अतिरिक्त दुष्काळी गावांची यादी जाहीर केली. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पारगाव महसूल मंडळाचा समावेश केला गेला आहे.
लोणी धामणी परिसरावर सातत्याने अन्याय होत आहे.गेली अनेक वर्षी या परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मात्र शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादीत आंबेगाव चा समावेश नसणेही खेदाची बाब आहे. यासंदर्भात मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तात्काळ हा विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडला होता अशी माहिती मा.पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले केले यांनी पंचनामाशी बोलताना दिली.
लोणी धामणी परिसरासाठी वरदान ठरणारी म्हाळसाकांत जलसिंचन योजना मार्गी लागणे गरजेचे आहे.दुष्काळ जाहीर झाल्याने कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटणार नाही.यासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. दुष्काळाचे सातत्य असल्याने परिसरातील अर्थकारण बिघडले असल्याची माहिती लोणी गावचे सरपंच सावळेराम नाईक यांनी पंचनामाशी बोलताना दिली.