आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथे आत्मक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!!

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथे आत्मक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!!
शहापूर -शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शाखा मोहिली – अघई, ता शहापूर, जि. ठाणे येथे आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष तसेच समस्त विश्वस्त मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात तीन दिवसीय आत्मक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात दि.२२डिसेंबर रोजी संकुलाच्या क्रीडागणात वार्षिक उत्सव निमित्त आत्मक्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, संत भारतमाता व शहापूर शिक्षण विस्तारअधिकारी शिवानी पवार,उपसरपंच निशिगंधा बोंबे मोहिली ग्रामपंचायत, स्थानिक व्यवस्थापन समिती विश्वस्त अनंत गायकवाड, प्रवीण मोरे, शैक्षणिक संचालक डॉ. डी. डी. शिंदे,सहाय्यक व्यवस्थापक गुलाब हिरे,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य पंकज बडगुजर आत्मा मालिक इंटरनॅशनल प्राचार्य आशिष काटे, आदी मान्यवर उपस्थित करण्यात आले. या क्रीडा स्पर्धा दि २२ते २४ दरम्यान मैदानी क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, खो- खो , कबड्डी, बास्केटबॉल, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स गोळा-फेक, थाळी-फेक यास्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.यात तालुक्यातील व जिल्हातील अनेक शाळा सहभागी झाल्या. या आत्मक्रीडा महोत्सवाचे वेळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीमान निलेश सांबरे साहेब,तसेच जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी निलेशजी भगवान सांबरे, मोनिका पालवे, शुभांगी पाटील, महेंद्र ठाकरे ,सुनील लकडे तसेच मोहिली केंद्रप्रमुख बाळकृष्ण बांगर, शिवनेरी माध्यमिक विद्यालय पिवळी मुख्याध्यापक श्री देशमुख सर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ठाणे श्री गायकवाड साहेब यांनी क्रीडा महोत्सवासाठी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दि. २४ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पांडुरंग बरोरा, ठाणे जिल्हा परिषद सभापती संजय निमसे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, अंभई शाखेचे विश्वस्त विलास आक्रे पाटील ,अभिजीत पाटील
तसेच ह.भ. प गोधडे महाराज आदी मान्यवराच्या हस्ते विजेता खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले.
या महोत्सवासाठी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे पदाधिकारी तसेच क्रीडा विभागप्रमुख, क्रीडाशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.