वालवड चे पिक मिळवून देते आहे शेतक-यांना हक्काचे उत्पन्न!!

वालवड चे पिक मिळवून देते आहे शेतक-यांना हक्काचे उत्पन्न!!
पिंपरखेड प्रतिनिधी – या वर्षी राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरा आर्थिक फटका बसला आहे तो बळीराजा!! जोरदार पावसामुळे शेतातील नगदी,चारा पिके सडून गेली आहेत. ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेताच्या कामात गुंतून गेला आहे.
पावसामुळ शेतातली ऊभी पिके जरी सडून गेली असली तरी वालवड या पिकाने मात्र बळीराजाच्या तोंडावर हास्य परतले आहे. सध्या वालवड या पिकाला प्रती 10 किलोला गुणवत्तेनुसार 600 ते 700 रुपये भाव मिळतो आहे. पण सध्या वातावरणात अचानक बदल होत असल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यात फवारणीसाठी लागणा-या औषधांच्या किमती गगनाला भिडल्याने उत्पादन आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ साधताना बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पिंपरखेड (ता.शिरूर) येथील वालवड उत्पादक शेतकरी श्री. राहुल औटी, सोमनाथ औटी यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.