आरोग्य व शिक्षण

भारतीय जैन संघटना(B.J.S.) उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!!

भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!!

वाघोली -येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 31 जानेवारी 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे प्रमुख प्रा.श्री. संजय कत्ते व प्रा सौ. सिंह यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब अध्यक्ष चे श्री. परमानंद शर्मा यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून केली. प्रमुख पाहुणे उद्घाटक श्री. परमानंद शर्मा आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी ई कचऱ्या बाबत जागरूक राहून ई कचरा कशा पद्धतीने नाहीसा करता येईल याची माहिती देवून या मोहिमेत सहभागी होण्याचे अवाहान त्यांनी विद्यार्थी व पालकांना केले.

प्राचार्य श्री. संतोष भंडारी सरांनी मुलांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री भंडारी सर, उपप्राचार्य गेठे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कत्ते सर सौ सिंग मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात लावणी, भजन, भारुड, गीतगायन, नकला, पोवाडा विविध गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. महाराष्ट्राची प्रतीक लावणीने लक्ष वेधून घेतले, तसेच विविध गायन आणि नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांचे मनोरंजन केले.

या कार्यक्रमाचे परीक्षण श्री अंधारे सर ,तोरडमल मॅडम, चासकर मॅडम, भोंडवे मॅडम, औटी मॅडम, यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उप प्राचार्य श्री गेठे सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभागी विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.