आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जाते मुर्ती राहते किर्ती!!कै.घनश्याम खाडे (आण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

जाते मुर्ती राहते किर्ती!!

महाराष्ट्रातील कवलापुरच्या तमाशा रंगभुमीवरील,एक नामवंत, गुणवंत नायक,कै.काळु बाळु तमाशा मंडळाला चौथ्या पिढीत योगदान देऊन, तमाम रसिकांच्या ओठांवर आपले नाव ठेवून, या तमाशा मंडळाची ज्योत अखंड महाराष्ट्राच्या काण्याकोपर्यात लावून प्रकाश देणारा कै.घनश्याम खाडे (आण्णा) होय…..

शेवटी आण्णांनी मायारूपी सोन्याचा पिंजरा सोडून जगाचा निरोप घेतला.तमाशा शाखेचा सच्या, प्रेमी माणुस म्हणजेच आण्णा!!साधी राहणी, उंच विचार,गोड वाणी, रसिकांना प्रेम मायेचा जिव्हाळा म्हणजेच आण्णा!!कलाकारांची जाणीव,सुख दु: खाची ओढ,खरे बोलणे, निष्ठावंत माणूस म्हणजेच आण्णा!!गोरगरीबांवर मायेची पाखरं घालणारा,तन,मन, धन एकी करुन अभिनयाची बाजु मांडणारा म्हणजेच आण्णा!!

(एक आठवण)मी कवलापुरला “बंद करा स्री भ्रुणहत्या”हे वगनाट्य देण्यासाठी गेलो असता,मला घरातील एक सदस्य म्हणून प्रेमाची वागणुक दिली,खरच अशी मुर्ती पुन्हा जन्माला येणार का?…..
आठवण आली म्हणजे डोळ्यात गंगा यमुना वाहू लागतात…….
परमेश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो. हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक
शाहीर खंदारे
ता.नेवासा
मो.८६०५५५८४३२

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.