श्री.शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज धामणी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा २०२२-२३ निरोप समारंभ संपन्न!!

श्री.शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज धामणी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा २०२२-२३ निरोप समारंभ संपन्न!!
उपस्थित मान्यवरांनी दिल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!!
आज श्री.शिवाजी विद्यालय धामणी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणी गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ.रेश्मा अजित बोऱ्हाडे ह्या होत्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करत त्यांना आठवण म्हणून एक कप देऊन शिक्षाकांप्रति आदर व्यक्त केला. तर बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तब्बल बारा हजार रु. रोख रक्कम स्टाफरूम सुधारणेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.गायकवाड सर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा अक्षरशः पानावल्या होत्या. एवढे दिवस एकत्र घालवून आजचा त्यांचा शाळेतील शेवटचा दिवस त्यांना सहन होत नव्हता. तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी शाळेचा निरोप घेतला.
यावेळी धामणी सरपंच सौ.रेश्मा बोऱ्हाडे,ख.वि.संघ मा.अध्यक्ष भगवानराव वाघ,शिरदाळे उपसरपंच श्री.मयुर सरडे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव,अक्षयराजे विधाटे,सुरेखा रोडे,मा.सरपंच सागर जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष नितीन जाधव ,मा.सरपंच तथा पत्रकार अंकुश भूमकर ,सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्थाविक प्राचार्य श्री.गायकवाड सर यांनी केले तर आभार शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री.रामदास जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार मॅडम यांनी केले.