शिरदाळे(ता.आंबेगाव) गावच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया मनोज तांबे यांची बिनविरोध निवड!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) गावच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया मनोज तांबे यांची बिनविरोध निवड!!
आज शिरदाळे गावची सरपंच पदाची निवडणूक पार पडली असून सरपंच पदी सौ.सुप्रिया मनोज तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच सौ.जयश्री संतोष तांबे यांनी काही दिवसांपूर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज शिरदाळे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.विश्वास शिंदे सर यांनी काम पाहिले. तसेच ग्रामसेवक श्री.अनिल टेमकर यांनी नवनियुक्त सरपंच सौ.सुप्रिया मनोज तांबे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेऊन ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मावळत्या सरपंच सौ.जयश्री तांबे यांनी नवनियुक्त सरपंच सौ.सुप्रिया तांबे यांचा सन्मान केला.
यावेळी उपसरपंच श्री.बिपीन चौधरी,मा.उपसरपंच श्री.मयुर सरडे,श्री.गणेश तांबे,श्री.तान्हाजी महाराज तांबे यांनी नवनियुक्त सरपंच यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.सरपंच मनोज तांबे,मा.सरपंच सौ.वंदना तांबे,पोलीस पाटील सौ.कल्पना चौधरी,सौ.विजया चौधरी,मा.चेअरमन कांताराम तांबे,श्री.कोंडीभाऊ तांबे,श्री.राजेंद्र चौधरी,श्री.राघू रणपिसे,सोसायटी संचालक श्री.जयदीप चौधरी,श्री.शंकर दत्तात्रय तांबे,श्री.स्वप्नील दिलीप तांबे,श्री.स्वप्नील केरभाऊ तांबे,श्री.विठ्ठल तांबे गुरुजी,श्री.संजय तांबे,श्री.नानाभाऊ रणपिसे,श्री.प्रदीप चौधरी,श्री.बाळासाहेब चौधरी,श्री.बाळासाहेब रणपिसे,श्री.विक्रम तांबे,कु.शंकर तांबे तसेच श्री.गणपत भांडारकर,शांताबाई चौधरी,स्वाती कोकणे उपस्थित होते.
यावेळी सरपंच म्हणून मा.सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील, मा.उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया तांबे यांनी सांगितले.