आत्मा मालिकच्या सागर अहिरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!!

आत्मा मालिकच्या सागर अहिरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!!
नाशिक – क्रीडा संस्कृती फाऊडेशन यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्य.गुरुकुलातील शिक्षक सागर अहिरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्हातील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले सन २०२४-२५ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सागर अहिरे यांना पद्यश्री मा. ब्रम्हानंद सांगून कामत शंकरवाल अर्जुन पुरस्कार विजेते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरखनाथ बलकवडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी दुधारे अलोम्पिक निरीक्षक परभणी जिल्हा संघटक सुशील देशमुख यांच्या उपस्थितीत राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित,आत्मा मालिक माध्य.गुरुकुलात
सागर अहिरे हे गेल्या १८ वर्षांपासून शिक्षक म्हणून सेवा देत असून शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले तर संस्थेच्या आध्यत्मिक कार्यात आपल्या सेवेतून योगदान दिले आहेत तर कोरोना काळात तंत्रस्नेही शिक्षक म्हणून संस्थेसाठी आत्मा मालिक न्युजची सुरावात केली त्यामाध्यमातून संस्थेच्या विविध संकुलातील शैक्षणिक घडामोडीबाबत संपूर्ण राज्यात डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी मिळवून दिली.
संस्थेच्या चॅनलचे २१ हजार पेक्षा जास्त फोल्लोवॉर्स असून डिजिटल युगात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब उपाध्यक्ष भगवानराव दौंड साहेब सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब व विश्वस्त उमेश जाधव साहेब व समस्त विश्वस्त मंडळ व्यवस्थापक सुधाकर मलिक ,साईनाथ वर्पे ,माई पटेल,प्राचार्य निरंजन डांगे ,माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे व आत्मा मालिकचे शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.