आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

कु.फिजा सय्यद हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान !!

पंचनामा अकोले प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू कु. फिजा सय्यद हिला जिल्हा क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला आहे.१ मे महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरगे आदी उपस्थित होते. सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन २०१९ – २० या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार कु.फिजा फत्तू सय्यद हिला घोषित केला आहे. त्याचे वितरण जिल्हा पोलीस ग्राउंड वरती करण्यात आले.

कु.फिजा सय्यद ही सॉफ्टबॉल खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून तीला हा पुरस्कार प्राप्त झाला असून तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.